विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, नाशिक

नाशिक महसूल विभागात कार्यरत असलेल्या महसूल क्षेत्रीय स्तरावरील विविध संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यासाठी दिनांक 10/8/2006 रोजी “नाशिक महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक” ही संस्था स्थापन करण्यात आली. त्यानंतर राज्य शासन सेवेत सर्व स्तरावर कार्यक्षमता वाढवून गतीमान प्रशासनाची संकल्पना साध्य करण्यासाठी तसेच आर्थिक, सामाजिक, राजकीय व तांत्रीक बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना सामोरे जाणे व प्रशासनामध्ये बदलासाठी आवश्यक असणारी लवचिकता साध्य करणे, याबाबत सर्व स्तरावर प्रशिक्षण देण्याची गरज विचारात घेऊन दिनांक 23/9/2011 रोजी “महाराष्ट्र राज्याचे प्रशिक्षण धोरण” निश्चित करण्यात आले. विभागीय मुख्यालयाच्या स्तरावर प्रशिक्षण विषयक कामकाज पार पाडण्यासाठी दि.14/10/2013 अन्वये नाशिक महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक या संस्थेस “विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, नाशिक” म्हणून घोषित करण्यात आले. त्यास अनुसरुन यशदा, पुणे यांच्या अंतर्गत व मार्गदर्शनाखाली राज्यातील व विशेषत: नाशिक महसूल विभागातील राज्य शासकीय गट-ब संवर्गातील अधिकारी आणि गट-क संवर्गातील कर्मचारी यांच्याकरीता पायाभूत, पदोन्नती पश्चात व उजळणी या स्वरुपाचे प्रशिक्षण वर्ग या संस्थेत आयोजित करण्यात येतात.

Vision

To set Nashik region as the benchmark for good governance and prompt public issue redressal by empowering officers with the skill and knowledge.

Mission

  • To empower officers with the skills and knowledge required to excel in their careers by offering accessible, governance-aligned training programs that foster continuous learning and personal growth.
  • To bridge the skills gap by providing comprehensive training that prepares individuals for successful employment in public service, while promoting lifelong learning and career advancement.
  • To cultivate a skilled public servant by delivering high-quality training programs through innovative e-learning experience.
Teachers
मा. श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य
Teachers
श्रीमती व्ही. राधा (भा.प्र.से.)
अपर मुख्य सचिव
(सामान्य प्रशासन)
Teachers
डॉ. प्रवीण गेडाम (भा.प्र.से.)
विभागीय आयुक्त
नाशिक
Teachers
श्रीमती जयरेखा निकुंभ
संचालक
विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था